अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न..

अमळनेर (प्रतिनिधि )निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची 147 वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प.प.पू.प्रसाद महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी,सल्लागार व समाज बांधव उपस्थित होते..
तसेच दुपारी मिरवणुकीच्या मार्गावर सुशोभित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या .
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष व पारंपारिक वाद्यचा तालावर मिरवणूक वाडीचौक- पानखिडकी- सराफ बाजार -दगडी दरवाजा- गाडगेबाबा चौक मार्गे मिरवणूक गाडगेबाबा उद्यानात समारोप करण्यात आला
गाडगेबाबा चौकात राकेश भाऊ परदेशी व युवा परीटधोबी मंडळ व परदेशी धोबी समाजाच्या वतीने शरबत वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदरजयंती व मिरवणुक कार्यक्रमास “युवा परीट मंडळ” व “परदेशी धोबी समाज” बंधु व भगिनी मोठ्या व विक्रमी संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोघे कार्यकारिणीतील सदस्य व सल्लागार व समाज बांधवांनी प्रयत्न केले.