नेहरू चषक हॉकी शालेय स्पर्धाविद्या इंग्लिश ने तिहेरी चषक पटकविले..

0


24 प्राईम न्यूज 2 Sep 2025. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू चषक आंतरशालेय पंधरा वर्षा आतील मुले तसेच सतरा वर्षा आतील मुले व मुली यांच्या हॉकी स्पर्धा पोलीस कवायत मैदान जळगाव येथे संपन्न झाल्या.
त्यात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल ने पंधरा वर्षे मुलं व 17 वर्षे मुलींमध्ये सुवर्णपदक तर सतरा वर्षा मुलांच्या गटात रजत पदक पटकावून तीन चषक पटकविले.
पंधरा वर्षे मुलं व सतरा वर्षे मुलीं मध्ये गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेते पदक पटकाविले तर तिन्ही गटात पोदार इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला.

विजेते उपविजेते संघांना हॉकी जळगाव व स्पोर्टस हाऊस तर्फे चषक व मेडल प्रदान
तिन्ही गटातील विजयी व उपविजय खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक व नेहरू चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमुखातिथींची उपस्थिती
हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक मीनल थोरात, हॉकी जळगावचे उपाध्यक्ष अक्रम शेख, श्रीमती झुलेखा देशमुख, हिमाली बोरोले, मुजफ्फर शेख, ममता प्रजापत, फुटबॉलचे प्रशिक्षक वसीम रियाज, विद्याचे क्रीडाशिक्षक इमरान बिस्मिल्ला, आदींच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे पंच
मुजफ्फर शेख, हिमाली बोरोले, इमरान बिस्मिल्ला, शहबाज पिंजारी, ममता प्रजापत यांनी कार्य केले.
नेहरू हॉकी चषक स्पर्धा अंतिम निकाल
१५ वर्षांतील मुले
विजयी. = विद्या इंग्लिश स्कूल
उपविजयी = गोदावरी इंग्लिश.
स्कूल
तृतीय = पोदार इंटरनॅशनल स्कूल

१७ वर्षांतील मुले
विजयी. = अँग्लो उर्दू हायस्कूल
उपविजयी = विद्या इंग्लिश स्कूल
तृतीय = पोदार इंटरनॅशनल स्कूल

१७ वर्षातील मुली
विजयी. = विद्या इंग्लिश स्कूल
उपविजयी = गोदावरी इंग्लिश. स्कूल
तृतीय = पोदार इंटरनॅशनल स्कूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!