अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून विनयभंग करण्याचा प्रयत्न  टाकरखेड्याच्या तरुणाला अटक..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टाकरखेड्याच्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अटक केली आहे. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये निर्माण होऊ शकणारी तणावाची परिस्थिती पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली.

घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दामिनी पथक आणि डायल ११२च्या कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहून त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवाजी बाग परिसरात एक तरुण अल्पवयीन मुलीला जबरदस्ती करीत असल्याची माहिती मिळताच ११२ चे कर्मचारी निलेश मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणासह मुलीला पोलिस स्टेशनला आणले.

मुलगी ही १७ वर्षीय असून सौंदाणे येथील रहिवासी आहे. तिची इंस्टाग्रामवर मोहीम हुसेन पिंजारी याच्यासोबत ओळख झाली होती. काही दिवसांसाठी ती टाकरखेडा येथे आली असता, परत जाताना मोहीमने तिला बसस्थानकावर गाठून “माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करीन” अशी धमकी दिली. त्यानंतर तिला जबरदस्तीने शिवाजी बागेत नेऊन अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

ही बाब समजताच पोलीस निरीक्षक निकम यांनी मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले व तक्रारीनंतर आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७९, ३५१(२) तसेच पोस्को कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

गणेशोत्सव व ईद सारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे वातावरण शांत राहिले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1270/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!