चोपडा येथे २१ डिसेंबर रोजी ८ वा ईज्तेमाई शादिया सोहळा; अल हुफ्फाज़ कमेटी शेखपूरा तर्फे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर

चोपडा (जि. जळगाव): अल्ल्हम्दुलिल्लाह! दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अल हुफ्फाज़ कमेटी शेखपूरा, चोपडा यांच्या वतीने ८ वा ईज्तेमाई शादिया सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा २१ डिसेंबर २०२५ रोजी (रविवार) बैतुल अन्वर, मुस्तुफा कॉलनी, चोपडा येथे होणार आहे.
या शाद्यांमध्ये मुलांच्या बाजूने ७ हजार रुपये, तर मुलींच्या बाजूने ठराविक रक्कम घेतली जाणार असून, उर्वरित खर्च कमेटीच्या वतीने केला जाणार आहे. इच्छुकांनी आपले नावे लवकरात लवकर नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शराईत व अटी:
- प्रत्येक जोडप्याला पलंग, बिछाना व भांडी दिली जातील.
- नावे नोंदविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.
- निश्चित संख्येनंतर नावे स्वीकारली जाणार नाहीत.
- निकाह सकाळी १०:३० वाजता होईल व वेळेचे काटेकोर पालन आवश्यक आहे.
- कार्यक्रमात फोटो व व्हिडिओग्राफीस सक्त मनाई असून नियम मोडल्यास नाव रद्द केले जाईल.
या सोहळ्यात सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.
संपर्कासाठी:
सैय्यद ज़फर अली सर – 9156433824 / 9326947624
मौलवी मोहम्मद अज़हर साहब, अमळनेर – 9028126314