अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची सभा उत्साहात पार; शेतकरी प्रश्नांवर सरकारवर जोरदार टीका.. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तहसीलदाराना निवेदन..

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे पार पडली. तालुकाध्यक्ष श्री भागवत केशव सूर्यवंशी यांनी नुकतीच गठीत केलेल्या कार्यकारिणी सदस्यांसमवेत घेतलेल्या या सभेस जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री बाळासाहेब प्रदीप पवार प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तालुकाध्यक्ष सूर्यवंशी यांनी अजेंड्यानुसार प्रास्ताविक करताना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, कापूस निर्यातबंदी यांसारख्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचे सांगितले.

या सभेत श्री गजेंद्र साळुंखे यांनी नगरपालिकेच्या निवडणूक प्रभागांवर, तर श्री मनोज पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर मते मांडली. श्री संदीप घोरपडे यांनी जनजागृतीसाठी “कामतवाडी ते कपिलेश्वर पदयात्रा” काढण्याचे आवाहन केले.

श्री बाळासाहेब पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना संघटन मजबुतीसाठी मार्गदर्शन करताना कोपरखड्या मारल्या व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळवण्यावर भर दिला. तसेच अमळनेर तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकत ते व्यवस्थित करण्याची जबाबदारी श्री लोटन अण्णा चौधरी यांच्यावर सोपवली. त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर “वोट चोर के खिलाफ, मैं राहुल गांधी के साथ हूँ” या स्वाक्षरी मोहिमेत सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सभा व कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी 5.30 वाजता झाली. कार्यक्रमाला श्री लोटन अण्णा चौधरी, सौ. सुलोचना वाघ, विवेक पाटील, गोकुळ बोरसे, प्रा. शाम पवार, शांताराम पाटील, प्रवीण जैन, एड. डी.वाय. पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 98100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!