अमळनेरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव; पोलिसांकडे कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान माळीवाडा परिसरात वादग्रस्त घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे १०:३० वाजता निघालेल्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या घरावर गुलाल तसेच चप्पल फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेमुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील प्रतिनिधींनी तत्काळ पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “आम्ही शांतता राखत आहोत, मात्र आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा समाजाने दिला आहे कायद्याचे बंधन प्रश्नचिन्हाखाली
सार्वजनिक मिरवणुकांसाठी वेळेचे बंधन असतानाही उशिरा रात्रीपर्यंत मिरवणुका निघत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “मिरवणुकीत नियम पाळले जातात का?” असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून खबरदारीचे उपाययोजना केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, “या प्रकाराचा सखोल तपास करून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 109500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 83200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट