जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :फ़ि-सबीलिल्लाह फाऊंडेशन, अमळनेरच्या वतीने जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या
औचित्याने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवारी कसाली मोहल्ला, अमळनेर येथे घेण्यात आले डॉ. सोनल महाजन (चेडे) MBBS. DGO. DNB. (स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ) रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनात या शिबिरात ५५ महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली. गर्भवती व विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुलींसाठीही विशेष तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच थायरॉईड, कमरदुखी, शरीरातील कमजोरी, गर्भावस्थेशी संबंधित आजार, स्तनरोग इत्यादींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. तपासणी केलेल्या सर्व महिलांना मोफत औषधेही देण्यात आली.
रक्ततपासण्यांवर विशेष सवलत देण्यात आली होती. एएनसी प्रोफाईल, सीबीसी, थायरॉईड, एलएफटी, आरएफटी या चाचण्यांवर ४० टक्के सूट तसेच ब्लड ग्रुप तपासणी व ब्लड शुगर तपासणी फक्त ५० रुपयांत करण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. उज़्मा शेख, डॉ. एजाज रंगरेज, डॉ. रहीस बगवान यांच्यासह साधना पाटील, बबिता कानोजे, राहुल महाजन, भावना महाजन यांनी परिश्रम घेतले. तसेच अरशद पठाण, आकिब खान, वालिद शेख, फरहान शेख, इब्राहिम सर, ज़ुबेर शेख, अरशान खान, मुज़म्मिल शेख, नईम पठाण यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 109500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 83200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट