प्रभाग १० च्या सीमांकनात बदल; नागरिकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील प्रभाग क्रमांक १० चे विभाजन करून नदीपलिकडील भाग प्रभाग १२ ला जोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सूरज परदेशी यांच्यासह स्थानिकांनी या निर्णयाविरोधात नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
प्रभाग १० ला लागून असलेला वाडी चौक आणि गुरव गल्ली हा भाग लांब अंतरावर असलेल्या बोरी नदी पलीकडे असलेल्या प्रभाग १२ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा बदल आयोगाने नेमून दिलेल्या सीमांकनाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच अशा प्रकारच्या बदलामुळे नगरपरिषदेच्या विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होऊन नागरिकांच्या सोयीसुविधांवर परिणाम होईल, अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे.
या तक्रार निवेदनावर सूरज परदेशी, अतुल कुलकर्णी, सुनील देव, दर्शन भावसार, वंदना गुरव, सुशीला जाधव, गुलाब गुरव, संजय गुरव, नितीन सोमनाथ, भागवत, पंढरीनाथ भावसार, कल्पना बोरसे, सागर जाधव, नितीन गुरव, मीरा बागुल, माला बागुल, दर्शन गुरव, सूनंदा सोनार, लता शिंपी, केशव पुराणिक, आरोही भावसार, सोनाली जाधव, सुनंदा पाटील आदींच्या सह्या आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 109500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 83200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट