मनियार बिरादरीची समाजसेवेत भक्कम वाटचाल; १६८७ वैवाहिक वाद सोडवण्यात यश..

0

24 प्राईम न्यूज 8 Sep 2025

जळगाव : मनियार बिरादरीतर्फे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैवाहिक क्षेत्रात उपक्रम राबवले जात आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना, रुग्णांना व महिलांना मदतीचा हात देत बिरादरीने ठसा उमटवला आहे.
वैवाहिक वाद सोडवण्यात आघाडी
बिरादरीच्या तडजोड समितीकडे आजवर पती-पत्नीमधील एकूण २८२० प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी तब्बल १६८७ प्रकरणे सामोपचाराने सोडवली गेली आहेत. तर ३५४ तलाक, २१२ खुलआ झाली असून, काही प्रकरणे पोलिस व न्यायालयीन स्तरावर नोंदली गेली आहेत. सध्या १६७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
शैक्षणिक योगदान
महापालिकेच्या तीन उर्दू शाळा पाच वर्षांसाठी दत्तक प्रयत्नातून शहरात दोन नवीन उर्दू माध्यमिक शाळा सुरू
शैक्षणिक मदतीतून २९७५ विद्यार्थ्यांना लाभ
सामूहिक विवाहातून बचत व मदत
आजवर बिरादरीतर्फे २३ सामूहिक विवाह सोहळ्यांत ३५४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. लग्नात प्रत्येक जोडप्याला ५० भांडी संच व १०० लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली.
महिला स्वावलंबनासाठी प्रयत्न
१७८ महिलांना शिलाई मशीन वाटप
३७ पुरुषांना व्यवसायासाठी आर्थिक मदत
जकातीतून सामाजिक कार्य
रुग्ण मदत : ३५७५ जणांना
शैक्षणिक मदत : २९७५ विद्यार्थ्यांना
गरजूंना मदत : १९,७५० जणांना
नैसर्गिक आपत्ती मदत : ३९८ जणांना
कैद्यांसाठी उपक्रम
कैद्यांसाठी दरवर्षी सहेरी व इफ्तारचे आयोजन केले जाते. तसेच जामिनासाठीही मदत केली जाते.
संघटनेची वाढती ताकद
मनियार बिरादरीची स्थापना १८ मे २००० रोजी झाली. त्यावेळी ५००० सदस्य होते, तर आज सदस्यसंख्या ८००० वर पोहोचली आहे. अध्यक्ष फारुख शेख, सेक्रेटरी अजिज शेख, तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर, जकात समितीचे ताहेर शेख, अब्दुल रऊफ, अल्ताफ शेख यांच्या सहकार्यातून उपक्रम राबवले जातात.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : अध्यक्ष फारुख शेख – ८८८८०२५७८६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!