कवी प्रवीण महाजन यांचा गोव्यात गौरव ..

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल – येथील पत्रकार तथा औदुंबर साहित्य रसिक मंचाचे कार्याध्यक्ष प्रवीण आधार महाजन यांचा नुकताच पुष्परत्न साहित्य समूह नासिक तर्फे गोवा येथे आयोजिलेल्या पहिले राष्ट्रीय प्रवासी कविसंमेलन व पुष्परत्न काव्यगौरव सोहळ्याप्रसंगी सन्मानचिन्ह , मानपत्र देऊन गोव्याचे साहित्यिक तुळशीदास देसाई यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोव्यातील लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर , पुष्परत्न साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रा.डॉ. आनंद आहिरे,कवयित्री चित्रा क्षीरसागर,सारिका बापट, रजनी रायकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या संमेलनात प्रवीण महाजन यांच्या आनंदाचे झाड या कवितेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.गोव्यातील वास्को द गमा येथील मुरगाव हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या राष्ट्रीय संमेलनात श्री प्रवीण महाजन यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या या यशाबद्दल ठाण्यातील सप्रेम नमस्कार या एकपात्री प्रयोगाचे कलाकार श्रीप्रकाश सप्रे, अमरावतीचे साहित्यिक शिवा प्रधान,संभाजी नगरचे प्रा.डॉ. संघर्ष सावळे , नाशिकचे संजय आहीरे,मुंबईचे डॉ. बालाजी गायकवाड, औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष ॲड. मोहन शुक्ला, ॲड. विलास मोरे, प्रा.वां.ना आंधळे आदींनी अभिनंदन केले आहे.