शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये स्वातंत्रवीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी…

0

एरंडोल (प्रतिनिधि) शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल येथे स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांची ५७ वी पुण्यतिथी दि २६-०२-२०२३ रविवार रोजी साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . पराग कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून अभिवादन केले आणि सावरकरांबद्दल मनोगत व्यक्त करत सांगितले की, क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सर्व क्रांती कारकांसाठी एक प्रेरणास्थान होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी झिजवलं. ब्रिटीश सरकारनं त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवलं. अंदमानातील कोठडीत त्यांना अक्षरश: घाण्याला जुंपण्यात आले. हे सर्व हाल सहन करूनही सावरकर डगमगले नाहीत. अंदमानातून परत आल्यानंतर सावरकरांनी समाजसुधारणेसाठी मोठे कार्य केले. हिंदू धर्मातील जातीभेत दूर व्हावेत यासाठी सतत प्रयत्न केले. हिंदू महासभा या राजकीय पक्षाची स्थापना केली. वीर सावरकर यांनी १९०५ च्या फाळणी नंतर पुण्यामध्ये परदेशी कपड्यांची होळी केली स्वातंत्र्यासाठी काम करताना त्यांनी एक गुप्त समाज स्थापन केला जो मित्र मेळा म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी अनेक देशभक्ती ने भरलेली दमदार भाषणे केली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. हे वाक्य जे फक्त बोलून थांबले नाहीत तर संपूर्ण आयुष्य ते या पद्धतीनं जगले. सावरकरांचे विचार हे नेहमीच प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जन्मगावातील घराला आजही अनेकजण नियमित भेट देतात. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन प्रा . सुनील पाटील व शेखर बुंदेले यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!