एरंडोल येथे उद्योजक व व्यावसायिकांना वाहन क्रमांक ठरत आहेत लकी नंबर.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथे काही उद्योजक व्यावसायिक, डॉक्टर्स, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी आपल्या दुचाकी व चार चाकी वाहनांचे क्रमांक पसंतीचे क्रमांक घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला सदर नंबर लकी ठरत असून आपली नंबर घेतल्यापासून भरभराट होत असल्याचा दावा काही उद्योजकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात पसंती क्रमांक लकी ठरल्यापासून आतापर्यंत ते वाहन व भ्रमणध्वनीसाठी त्याच नंबरला पसंती देतात असे आढळून आले आहे.
बालाजी उद्योग समूहला क्रमांकाच्या शेवटी झिरो चार या क्रमांकाला पसंती दिली जाते त्यांच्या सर्व युनिट मधील वाहनांचे क्रमांक शेवटी झिरो चार असलेले आढळून येतात, दुसरे उद्योजक डॉक्टर राजेंद्र चौधरी हे ७०७० क्रमांक शुभ मानतात, १९९३/९४ मध्ये चौधरी यांनी ७०७० क्रमांकाचा लँडलाईन नंबर घेतला तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात भरभराटीची व समृद्धीची सोनेरी पहाट उजाडली. तेव्हापासून त्यांच्या सर्व चार चाकी गाड्या व दुचाकी गाड्यांच्या क्रमांकाला त्याच नंबरची पसंती देण्यात आले आहे.
धनश्री इन्फ्रास्ट्रक्चर चे संचालक यांच्या सर्व वाहनांवर ९७ क्रमांकाला पसंती देण्यात आली आहे. त्यांना सुद्धा हा क्रमांक शुभ ठरल्याचा त्यांचे म्हणणे आहे.
मयुरी हॉटेलचे संचालक यांनी आठ हजार नऊशे या क्रमांकाची निवड केली आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी यांच्या वाहनांवर ७७ क्रमांक लकी ठेवलेला दिसतो. डॉक्टर राजेश महाजन यांनी
भ्रमणध्वनी व वाहनांना शेवटी ५६०० क्रमांकाला पसंती देतात.
चॉइस नंबर मुळे आपल्या आयुष्यात समृद्धी व भरभराट होईल अशी श्रद्धा असलेली विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पसंतीच्या क्रमांकाला नेहमी प्राधान्य देतात वाहन क्रमांक दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक हे त्यांचे लकी नंबर ठरतात असा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. मात्र हे लाख सर्वांच्या नशिबी येईलच असे सांगता येणार नाही.