दोन लाख रुपये ट्रस्टला भरण्याचे पत्र- मनपा च्या पत्राचा. विपर्यास- फारूक शेख.

जळगाव (प्रतिनिधि )महानगरपालिका सहाय्यक आयुक्त उदय मधुकर पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी जनरल सेक्रेटरी, मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट यांच्या नावे एक पत्र दिले व त्या पत्रात संदर्भ दिलेली पत्र तसेच मागणी केलेले १९४२५०/- रुपये जमा करण्याचे जे आदेश दिले ते वस्तुस्थिती नुसार नसल्याचे सविस्तर पत्र फारूक शेख यांनी आज सहाय्यक आयुक्त व आयुक्त मनपा यांना दिलेले आहे.
मनपाची नोटीस नव्हे पत्र
मनपा आरोग्य विभागाने एमआयडीसी पोलिसांनी अर्ज चौकशी करताना महानगरपालिकेत प्राथमिक चौकशी वरून नगरपालिकेची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे असे पत्र दिले होते परंतु मनपाने त्यावर पोलिसांना पत्र देऊन आपल्या स्तरावर उचित कारवाई करण्याचे पत्र दिले होते.
त्यानुसार तक्रारदार मुश्ताक सालार यांच्या तक्रार अर्जावरून ५ डिसेंबर २२ रोजी गुन्हा नोंद झालेला आहे व पोलीस तपास सुरू आहे
शेख यांच्या अटकपूर्व जामीनात कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण
सत्र न्यायाधीश जळगाव यांनी अटक पूर्व जामीन क्र ११०५/२२ मध्ये दिनांक २४ जानेवारी २०२३ ला सात पानी आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले असून त्यात फारुक शेख यांनी ट्रस्टच्या ठरावानुसार व घटनेनुसार जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. जे अनुदान प्राप्त केले आहे ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर प्रत्यक्ष केलेल्या कार्याबद्दल मनापा शी पत्रव्यवहार करून प्राप्त केलेला आहे. सदर अनुदान मनपाने नेटच्या माध्यमातून ट्रस्ट च्या बँक खात्यात जमा केलेले आहे त्यामुळे लाभार्थी शेख नसून ट्रस्ट ही लाभार्थी आहे. ज्या नातेवाईकांनी मृतांचा खर्च केला आहे त्यांनाही आपला खर्च ट्रस्ट देणार आहे त्यामुळे त्या नातेवाईकांनी ट्रस्ट शी संपर्क साधावा असे स्पष्ट आदेश असून सुद्धा मनपाच्या आरोग्य विभागाने त्याचा गांभीर्याने विचार न करता पत्र फारुख शेख यांच्या नावाने पाठवुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एफ आय आर रद्द साठी उच्च न्यायालयात याचीका दाखल
औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात सदर एफ आय आर ही कशी खोटी व असत्य असल्याने ती रद्द करावी म्हणून ३१ जानेवारी २३ रोजी उच्च न्यायालयात रिट पिटीशन शेख यांनी दाखल केली आहे.
लवकरच मानहानी चा खटला दाखल करणार
सदर मनपा च्या पत्रा मुळे शेख यांची बदनामी केल्या बद्दल ते संबधीता विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा त्यांनी पत्रकात म्हटले आहे.