देवगाव देवळीत आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी 72 लक्षची पाणीपुरवठा योजना. जि. प सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन…

0

गावाचा पाणीप्रश्न सुटणार,एकूण दिड कोटींच्या विकास कामांचे झाले भूमीपूजन.

अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील देवगांव-देवळी येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी 72 लक्ष ची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने या कामासह सुमारे दीड कोटींच्या विविध विकास

कामांचा भूमिपूजन सोहळा जि.प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला..!
या नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणार आहे.जयश्री पाटील यांचे गावात जोरदार स्वागत होऊन जल्लोषात सत्कार करण्यात आला,विकासाचा एकमेव अजेंडा आपल्या आमदारांचा असल्याने गेल्या तीन वर्षात मतदारसंघात झालेली विकास कामे आपल्या डोळ्यासमोर असून कोणत्याही गावावर अन्याय न करता समान न्यायाचे धोरण आमदारांनी ठेवले आहे,विकासाचा हा अखेरपर्यंत थांबणार नाही अशी भावना जयश्री पाटील यांनी व्यक्त केली.याप्रसंगी नगरसेवक दीपक पाटील, सरपंच सौ.सरला पुंडलिक पाटील, उपसरपंच संदीप जगन्नाथ शिंदे, मा.सरपंच नवल बाबूराव पाटील, धर्मराज आण्णा, राजाराम बैसाणे, गोकूळ पाटील यांच्या सह गावकरी नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले.

या विकास कामांचे झाले भूमीपूजन,,, डी.पी.डी.सी. अंतर्गत=मराठी शाळेला वॉलकंपाऊंड रक्कम 18.86 लक्ष, 2515 अंतर्गत आर.ओ. प्लांट बसविणे रक्कम 7.00 लक्ष, 2515 अंतर्गत स्मशानभुमी, सात्वन शेड बांधकाम रक्कम 8.00 लक्ष, MREGS अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम 20.00 लक्ष, आणि जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा रक्कम 72.00 लक्ष. असे एकुण 157.86 लक्षच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!