लाईनमन दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मानवंदना..

अमळनेर(प्रतिनिधि)४ मार्च २०२३ रोजी म.रा.वि.म. महामंडळामार्फत लाईनमन दिन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे साहेब अध्यक्ष म्हणून व श्री मनोज पवार साहेब कार्यकारी उपअभियंता ग्रामीण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री पी.वाय.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व लाईनमन दिन केंद्र शासनाने सूचना केल्या प्रमाणे प्रथमच साजरा करीत असल्याबद्दलचे महत्त्व विशद केले. अभियंता प्रफुल पाटील अभियंता गुजर, आदींनी लाईनमन बंधूंचे कार्याचे महत्त्व विशद केले. अभियंता गुजर,अभियंता कुरसुंगे ,अभियंता देशमुख आदी मान्यवर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे एडवोकेट भारतीय अग्रवाल यांनी आपल्या भाषणात” जय जवान जय किसान व जयप्रकाश दूत “हा नारा दिला व उपस्थित सर्व लाईनमन बंधू-भगिनींची मने जिंकली. आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सर्वांना मानवंदना देण्यातआली.जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ल यांनी लाईनमन बंधू हे अतिशय तातडीचे सेवेत सुद्धा ग्राहकांना रात्री बेरात्री मदत करत असल्याचे त्यांनी सत्य घटना सांगितली. सचिव सौ कपिला मूठे यांनी आमचे शेतात व शेतकरी बांधवांना नेहमी तत्परतेने मदत करीत असतात असे नमूद केले. जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी यांनी सदर लाईनमन बंधूंनी करोना काळात “करोना योद्धा ” म्हणून कार्य केलेले असल्याचे परंतु दखल न घेतले गेल्याबद्दल खंत व्यक्ती केली. परंतु आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आपला कार्याची दखल घेऊन आपल्या कार्याला सलाम आहे असे म्हटले व आम्ही आपले ऋणी आहोत असे सांगितले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सर्व लाईनमन बंधू-भगिनींना शुभेच्छा देण्यातआल्यात. याप्रसंगी ग्राहक पंचायतीतर्फे थंड पेयजल सर्वांना देण्यात आले होते अशी माहिती सौ मेहराज बोहरी कळवितात.