पाटील महाविद्यालयात नवनिर्वाचित आमदार सत्यजित ताबे यांचा भव्य नागरी सत्कार ….
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे, नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचे आवाहन….

एरंडोल (प्रतिनिधि) येथील य.च.शि. प्रसारक मंडळाच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार सत्यजित तांबे यांचा भव्य नागरी सत्कार संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी आज ४ मार्च रोजी केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, माजी प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ.ए. ए. बडगुजर, उपस्थित होते.
यावेळी आमदार सत्यजित तांबे निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले. व भविष्यात समाजातील सर्व वर्गाच्या समस्या मी प्रतिनिधी म्हणून विधिमंडळाकडून सोडवण्याचे आश्वासन दिले. आपण सर्वानी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील हे होते.
दरम्यान एरंडोल मधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात निवेदने देण्यात आले व सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रा. ती काबरे विद्यालयाचे सहशिक्षक बी के धुत आभारप्रदर्शन विखरण विद्यालयाचे सहशिक्षक श्री. राजेंद्र शिंदे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला मोठयासंख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.