पाचोरा न्यायालयात ई-फायलिंग शिबिर संपन्न..

पाचोरा (प्रतिनिधि)येथील तालुका न्यायालयात ई-फायलिंग शिबिर संपन्न झाले सदर शिबिरात एरंडोल येथील अडव्होकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन यांनी ई-फायलिंग म्हणजेच ऑनलाइन दावे किंवा खटले

कसे दाखल करावे याबाबत ट्रेनर म्हणून पाचोरा येथील वकिलांना तसेच त्यांचे क्लर्क कारकून यांना ई-फायलिंग बाबत मार्गदर्शन करून ट्रेनिंग दिले सदर कार्यक्रमास चांगली उपस्थिती होती न्यायमूर्ती श्री जीबी औंधकर मुख्य दिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच श्रीमती एमजी हिवराले सहदिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच श्री आय व्ही श्रीखंडे साहेब सहदिवाणी न्यायाधीश पाचोरा यांनी आज अडवोकेट ज्ञानेश्वर महाजन यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सदर कार्यक्रमास पाचोरा न्यायालयाचे नाझर अरुण आर पाटील तसेच नाझर जी आर पवार तसेच दीपक तायडे ज्युनियर क्लर्क कॉम्प्युटर ब्रांच ,श्री दीपक पाटील ज्युनिअर क्लर्क, जावेद शेख बेलीफ ,ईश्वर पाटील शिपाई तसेच पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट प्रवीण बी पाटील एडवोकेट श्री मंगेश गायकवाड उपाध्यक्ष पाचोरा बार, एडवोकेट राजेंद्र बी पाटील सेक्रेटरी आणि सर्व स्टाफ वकील संघ यांनी सहकार्य केले. माननीय हायकोर्ट मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा न्यायालय यांनी मास्टर ट्रेनर म्हणून एडवोकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन एरंडोल यांची ई फाइलिंग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केलेली होती.