बीड शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले चोरीच्या गुन्हयातील चारचाकी वाहन आरोपीतांसह अटक- चाळीसगांवरोड पोलीस स्टेशनची धडक कारवाई.

धुळे (अनिस अहेमद) – ०४/०३/२०२३ रोजी मा. पोनि सो धिरज महाजन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक पिकअप गाडी ही आयशा नगर, चाळीसगांव रोड येथील नॅशनल हायस्कुल करीम मच्छीवाला याच्या घराशेजारी रोडावर सार्वजगी संशयितरित्या लावलेली असून सदर वाहन चोरीचे असावे याबाबत माहीती मिळाल्याने मा. पोनि सो धिरज महाजन यांनी तात्काळ शोध पथकातील कर्मचारी पोहेकॉ / १२४२ चव्हाण, पोहेकॉ/४१६ पाटील, पोना /५४ बी.आय.पाटील, पोकों/११८० सोनवणे, पोका/१५६८ वैराट, पोकों/१६८६ जाधव, पोकॉ/२९ झोलेकर यांना सदर वाहनाबाबत माहीती देवून सदर वाहनबाबत खात्री करून संशयित वाहन द आरोपीतांचे शोध घेवून खात्री करणे बाबत आदेशीत केल्याने नमुद पथक हे आयशा नगर मध्ये नॉशनल हॉयस्कुल करीम मच्छीवाला याच्या घरा शेजारी रोडावर सार्वजगी गेले असता त्यांना संशयित वाहन व त्याठिकाणी एक इसम मिळुन आला त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने आपली नावे १) नाजीम मलक आब्दुल वय ३६ व्यवसाय मंजुरी रा. मिलत नगर धुळे असे सांगीतले त्यास संशयित वाहनाबाबत अधिक विचारना केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिले, त्यानंतर पोनि धिरज महाजन यांनी वाहन क्रमांकावरून खात्री केले असता सदर वाहन बीड येथील असल्याचे समजले असता संशयित इसम यास विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने सदर वाहन हे बीड शहर येथुन चोरी केले बाबत कबुली दिली आहे.
त्याप्रमाणे बीड शहर येथे खात्री केली असता फिर्यादी मोमीन आखील मोमीन अजीम, वय ३० वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर रा. तकीया मशिद गुलजारपुरा ता. जिल्हा बीड यांचे फिर्यादीवरून बीड शहर पोलीस स्टेशन येथे गुरन- ४४/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे दाखल आहे. संशयित इसम १) नाजीम मलक आब्दुल (ऊर्फ नाजीम कबुतर) वय३६ व्यवसाय मजुरी रा. मिलत नगर धुळे याचेकडून वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-
१) रुपये ३,००,०००/- किंमतीची पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप मॉडल BOLERO CAMPER SC XL जिचे पासग क्रमाक MH १४ M४९१५ असा असलेली व तीचा चेचीस नं. MA9ZN2GHLC9L1७७७९६ व इंजिन नं. GHC१४८६९४ असा असलेली जु.वा. की. अ.
सदर वाहन संशयित इसमाकडुन हस्तगत करण्यात आलेले असून संशयित इसमावर धुळे जिल्हयात व इस्तत्र गुन्हे दाखल असून संशयित इसम सराईत चोर असल्याने व सदर गुन्हयाचा पुढील तपास बीड शहर पोलीस है करीत असल्याने संशयित इसम व चोरीस गेलेले वाहन त्यांचेकडे सपुर्त करण्यात येणार आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड सो, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो, मा. सहा. पोलीस अधीक्षक सो धुळे शहर विभाग एस. रुषिकेश रेडडी सो, धुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि धिरज महाजन, पोहवा / १२४२ पंकज चव्हाण, पोहवा/४१६ संदिप पाटील, पोना/ ५४ बी. आय. पाटील, पोकों/२९ चेतन झोळेकर, पोकों/११८० स्वप्नील सोनवणे, पोकों/१५६८ इंद्रजित वैराट पोकों / १६८६ शरद जाधव, पोकों/९३५ पवार, अशांनी केली आहे..