दादा आता तुम्हीच सहकार्य करा – भंगार बाजार शिष्टमंडळाचे सुरेश दादांना साकडे.

जळगाव (प्रतिनिधि) तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष असताना आपणच जळगाव विकासासाठी शहरातील भंगार बाजार उठवून अजिंठा चौकात विस्थापित केला होता व त्या गरीब कुटुंबीयांनी दादा आपल्या शहर विकास कामांना सहकार्य केले होते आता त्या ११७ गाळे धारकांना त्यांची काही एक चुकी नसतांना जागा खाली करण्याचे मनपा ने आदेश पारीत केले आहे त्यामुळे सुमारे एक हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने तत्कालीन नगर पालिकेने तो ठराव शासनाला सादर न केल्याने त्यास मान्यता नसल्याचे कारण देऊन त्या गालेधारकांना पुनःश्च रस्त्यावर आणले जात आहे म्हणून आपणच त्यांना सहकार्य करा व त्यांची मदत करा अशी आर्त हाक देऊन शिष्टमंडळाने माजी मंत्री सुरेश दादा जैन यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.
दादांचे त्वरित पत्र व दूरध्वनी
सुरेशदादांनी शिष्ट मंडळाचे ऐकून घेत मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना भंगार बाजाराची समक्ष सुनावणीची तारीख त्वरित लावून त्यांना सहकार्य करा असे विनंती पत्र देऊन ते पत्र शिष्टमंडळाच्या हाती स्वाधीन केले.
स्थानिक महानगरपालिका गटनेते यांच्याशी सुद्धा दूरध्वनी वर बोलून सहकार्य करण्याची विनंती केली.
या वेळी उद्योजक राजा भाऊ मयूर यांची उपस्थिती होती
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, शिवसेना महानगर अल्पसंख्यांक प्रमुख जाकिर पठाण, राष्ट्रवादी मीडिया प्रमुख सलीम इनामदार, ए.यू. सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शहा, भंगार बाजार कृती समितीचे बाबूसाहेब पटेल, सय्यद मुनिर,उस्मानिया नगरचे समाजसेवक जाकिर पेंटर, हुडकोचे सचिन सोनवणे आदींचा समावेश होता.