आ.फारुख शाह यांच्याहस्ते शास्त्रीनगर मधील काँक्रिट रस्त्यांचे लोकार्पण.

धुळे (प्रतिनिधि)धुळे शहरातील शास्त्रीनगर हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला आहे मात्र आजपर्यंत शास्त्रीनगर मध्ये महानगरपालिकेने कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा रस्ते गटारी केलेल्या नाहीत.मनपा सुविधा देत नाही म्हणून नागरिकांनी वैतागून काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेचे महापौर यांना निवेदन दिले होते की आम्हाला महापालिका क्षेत्रातून काढून ग्रामीण भागात टाका. नागरिकांची गरज ओळखून आ. फारुख शाह यांनी शास्त्रीनगर परिसरात स्थानिक विकास निधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ३४ लक्ष चा निधी उपलब्ध करून दिला.
शास्त्रीनगर परिसरात स्थानिक विकास निधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत सुमारे ३४ लक्ष निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले.या कामांचे लोकार्पण आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी शास्त्रीनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, दै.मर्डर चे संपादक राजु गर्दे,राज चव्हाण,बाळासाहेब निकुंभ,बाजीराव खैरनार,नेरकर सर,पाटकर सर,मधुकर कांबळे,जगताप नाना,युसुफ पापासर,आसिफ शाह,कैसर अहमद,फकिरा बागवान,सौ.चित्रा चीतोडकर,साधना परदेशी,रेखा सोनवणे,सुनंदा राजपुत, शितल सोनजे,अनु नेरकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.