एका मधमाशीने घेतले एका शेतकऱ्याचे जीव, जामनेर तालुक्यातील घटना.

0

जळगाव(प्रतिनिधि) शेतात मजुरांना जेवणाचे डबे देऊन घराकडे परततांना शेतकऱ्यावर मधमाशीच्या माध्यमातुन काळाने झडप घातली आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर नजीक असलेल्या लोंढ्री बुद्रुक या गावात दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला.

चावा घेतल्यानंतर मधमाशी घशात गेली.यात शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे.सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(वय २८, रा.लोंढ्री बुद्रूक ता.जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

लोंढ्री बुद्रूक येथील रहिवासी अमजद खाँ अस्लम खाँ पठाण याची शेंगोळे रस्त्यावर शेती आहे.सोमवारी त्याच्या शेतात मजुर कामावर आले होते,या मजुरांच्या जेवनाचे डबे घेऊन अमजद हे दुचाकीवरून शेतात गेले.मजुरांसोबत कामाविषयी झालं.त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून घराकडे परतत असताना वाटेत अचानक अमजद यांच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला.त्यानंतर ती मधमाशी थेट घशात गेली.

त्यामुळे त्याला वेदना होऊन श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली.त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले पण प्राथमिक उपचार मिळेपर्यंत अमजद खाँ पठाण यांची प्राणज्योत मालवली होती.

अमजद खाँ पठाण हे पहुर येथील अजमुद्दीन शेख यांचे जवाई आहेत.त्याच्या पश्चात आई-वडिलं, २ मुले, मुली आणि भाऊ असं कुटुंब आहे.अमजद खाँ पठाण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने लोंढ्री गावात शोकांतिका पसरली आहे.

एका मधमाशीमुळे अशापध्दतीने मृत्यू होऊ शकतो यावर नागरिकांचा विश्वास बसत नसणार.मात्र,प्रत्यक्षात अशी घटना घडल्याने मधमाशीला कुणी हलक्यात घेवु नये तर काही मधमाशीचा डंख हा विषारी असल्याने,ति चावल्यानंतर जीवाला धोका निर्माण होतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी.बुद्रुक या गावात दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला.
चावा घेतल्यानंतर मधमाशी घशात गेली.यात शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे.सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(वय २८, रा.लोंढ्री बुद्रूक ता.जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
लोंढ्री बुद्रूक येथील रहिवासी अमजद खाँ अस्लम खाँ पठाण याची शेंगोळे रस्त्यावर शेती आहे.सोमवारी त्याच्या शेतात मजुर कामावर आले होते,या मजुरांच्या जेवनाचे डबे घेऊन अमजद हे दुचाकीवरून शेतात गेले.मजुरांसोबत कामाविषयी झालं.त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून घराकडे परतत असताना वाटेत अचानक अमजद यांच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला.त्यानंतर ती मधमाशी थेट घशात गेली.
त्यामुळे त्याला वेदना होऊन श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली.त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले पण प्राथमिक उपचार मिळेपर्यंत अमजद खाँ पठाण यांची प्राणज्योत मालवली होती.
अमजद खाँ पठाण हे पहुर येथील अजमुद्दीन शेख यांचे जवाई आहेत.त्याच्या पश्चात आई-वडिलं, २ मुले, मुली आणि भाऊ असं कुटुंब आहे.अमजद खाँ पठाण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने लोंढ्री गावात शोकांतिका पसरली आहे.
एका मधमाशीमुळे अशापध्दतीने मृत्यू होऊ शकतो यावर नागरिकांचा विश्वास बसत नसणार.मात्र,प्रत्यक्षात अशी घटना घडल्याने मधमाशीला कुणी हलक्यात घेवु नये तर काही मधमाशीचा डंख हा विषारी असल्याने,ति चावल्यानंतर जीवाला धोका निर्माण होतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!