नंदुरबार शहरातील सुतार मोहल्ल्यात एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

0

नंदुरबार(फहीम शेख) शहरातील सुतार मोहल्ला मस्जीदचे मागच्या बाजूने राहणाऱ्या अबुजर शेख शकील या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळ ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
शहरातील सुतार मोहल्यात अबुजर शेख हाँ तरुण आई वडील व एक बहीण यांच्यासह वास्तव्याला होता.

रविवारी त्याची आई व बहीण हे नातेवाईकाच्या मुलीचे साखरपुडा निमित्त अमळनेर गावाला गेले होते तसेच वडील शकील शेख हे टॅक्सी चालक असुन हे ही टॅक्सी घेवुन बाहेर गावी गेले होते.

या वेळी घरात एकटा असलेल्या अबुजरने घराचे सर्व दार आतुन बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार त्याच्या चुलत अजोबा आणि गल्लीतील नागरिकांना समजल्यानंतर घराचे दार तोडून त्याला खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास इमाम बादशाह कब्रस्तान येथे इस्लामी रीतिरिवाजानुसार दफनविधी करण्यात अली.

अबुजर शेख हा आय टेक कॉम्प्युटर येथे त्याच्या मामा नवाज शेख सर यांच्या कडे काम शिकत होता तसेच बी एस सी तिसऱ्या वर्षाचा विदयार्थी होता, त्याच्या मागे त्याची आई वडील व दोन बहीण आहे.

अबुजर शेख हा दोन बहिणीचा एकच भाऊ होता, त्याची एक बहिणीचा लग्न झालेला आहे तर एकाचा लग्न बाकी आहे.

एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला होता.

या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे, याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात अली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!