आमदार साहेबांच्या हस्ते विधवांना रेशनकार्ड वाटप, बांधकाम कामगारांना साहीत्य वाटप, आयुष्मान भारत कार्ड वाटप तसेच मध्यान्ह भोजनाचा शुभारंभ..!
धुळे शहर आमदार फारुख शाह यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..

..!
धुळे (प्रतिनिधि) धुळे शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे कर्तव्यदक्ष आमदार फारुख शाह यांच्या वाढदिवसानिमित बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील विधवा

महीलांना रेशनकार्ड वाटप तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप व बांधकाम कामगारांना पेट्या साहित्याचे वाटप करण्यात आले या वेळेस महिला दिनाच्या पुर्वी शहरातील विविध क्षेत्रात ज्या महिलांनी महिलांसाठी काम केले त्यांना प्रशस्ती पत्र वाटप आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. धुळे शहरातील विविध भागातील नागरीकानी यावेळेस आमदार फारुख शाह यांचा शहर विकासाच्या कामाला बघुन त्यांचे जंगी सत्कार करण्यात आले. यावेळेस नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की स्वतंत्र काळापासून ते आजपर्यंत असे आमदार धुळे शहराला लाभले नाही. आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या मुलभूत सुख सुविधेसाठी करोडो रुपयाचा निधी आणला. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार मुलींचे लग्न सोहळा करणे, दिव्यांगाना पिवळे रेशनकार्डची सुविधा करून देणे, ज्यांना अन्न-धान्य मिळत नाही. अशा नागरिकांसाठी शासनाकडून कोटा वाढवून अन्न-धान्य उपलब्ध करून देणे,विधवा आणि परीतक्त्याना शासनाकडून अन्न-धान्य उपलब्ध करून कार्ड बनवून देणे तसेच बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेवून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या विकासासाठी एमआयडीसी साठी शहरातील कब्रस्थान तसेच एकविरा देवी मंदीर,जलाराम बाप्पा मंदीर यांच्यासाठी करोडो रुपयाचा निधी आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या अपेक्षा नसताना सुद्धा अनेक विषयामध्ये आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधकांच्या जातीवादी प्रवृत्तीला आपल्या विकास कामाने उत्तर देण्याचे काम आमदार फारुख शाह करीत आहे. असे मनोगत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले. या जन्म दिवसाच्या कार्यक्रमाला नगरसेवक सईद बेग मिर्झा, जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहध्यक्ष मुक्तार बिल्डर, पापा सर, हलीम अन्सारी, एकबाल शाह, जमील खाटीक, सउद सरदार, जाहीद हाजी, साजिद साई, सउद आलम, महिला शहरध्यक्ष फातेमा मॅडम, शकीला आपा, अकिला आपा व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.