आज श्रीराम भक्त प पु. महंत इश्र्वरदस महाराज, नंदगाव यांच्या हस्ते गजानन अलंकारचे थाटात उद्घान.. प्रथम पाच हजार ग्राहकांना मिळणार भेट वस्तु.

अमळनेर( प्रतिनिधि) आज श्रीराम भक्त प पु महंत ईश्वरदास महाराज,नंदगाव यांच्या शुभहस्ते या दुमजली दालनाचे उद्घाटन होऊन त्यानंतर हे दालन तमाम महिला भगिनींसाठी खुले होणार आहे.यानिमित्ताने सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रसाद ही आयोजित करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर सुव
र्ण नगरीत कार्यरत राहून नावलौकिक प्राप्त करणारे योगेश रतीलाल सोनार आणि दिनेश सुरेश पाटील यांनी हे दालन साकारले असून “विश्वास तुमचा आणि प्रामाणिकपणा आमचा”हे ब्रीदवाक्य घेऊन नव्या उमेदीने ते या व्यवसायात उतरले आहेत.अतिशय नाविन्यपूर्ण दालन त्यांनी साकरल्याने या दालनाची निश्चितच महिला भगिनींना भुरळ पडणार आहे.यानिमित्ताने अमळनेर नगरीच्या वैभवात अजून एक नवी भर पडली आहे.

प्रथम 5 हजार ग्राहकांना मिळणार भेटवस्तू,,, ग्राहकांना देवता संबोधणाऱ्या योगेश सोनार व दिनेश पाटील यांनी आपल्या दालनात प्रथम येणाऱ्या 5 हजार ग्राहकांना सोने दागिने खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्याची योजना जाहीर केली असून ही योजना निश्चितच ग्राहकांसाठी फलदायी ठरणार आहे.
गा गजानन अलंकार चे हे दालन सरकार मान्य BIS 916 हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राहणार असून पारदर्शी व्यवहार आणि विनम्र तत्पर सेवा हेच धोरण अवलंबविले जाणार आहे.
916 हॉलमार्क मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध असतील,सर्व दागिन्यांवर अत्यंत वाजवी मजुरी आकारली जाईल, या दालनात घेतलेले फॅन्सी BIS 916 हॉलमार्क दागिने मोडताना अगर बदली करताना वजनात घट(डाग) कापली जाणार नाही.,सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी कॅरोमिटर मशीनची सुविधा उपलब्ध., या दालनात घेतलेल्या दागिन्यांची शुद्धता ही केव्हाही कॅरेटो मशीन मध्ये विनामूल्य तपासून मिळेल.,जुन्या डिझाइन चे पारंपरिक दागिने बनवून मिळतील., चांदीचे पायल 1000 डिझाइन मध्ये उपलब्ध, जुन्या दागिन्यांना रिपेअरिंग करण्याची सुविधा.,स्वीप मशिनद्वारे तसेच ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था याठिकाणी असणार आहे. एकंदरीत या भव्य दालनात जास्तीतजास्त सुविधा देण्याचा प्रयत्न झाला असून गुणवत्ता,शुद्धता आणि ग्राहकांचा विश्वास यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याने निश्चितच हे दालन भरभराटीस येणार आहे.ग्राहकांच्या सेवेसाठी परिपूर्ण स्टाफ ही सज्ज झाला असून उद्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ निमित्त सर्व सन्माननीय महिला भगिनी आणि बंधूनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन योगेश सोनार आणि दिनेश पाटील यांनी केले आहे.