शास्त्री फार्मसी तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

एरंडोल ( प्रतिनिधि) महिला दिनाच्या अवचीत्याने दिनांक 8 मार्च रोजी एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे उपस्थित महिला प्राध्या
पक व विद्यार्थिनींचा पुष्पवर्षाव करून महिला दिन साजरा करण्यात आला.

प्रसंगी बोलत असताना अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री सर यांनी स्वावलंबी महिलांनी स्वतःचा व समाजाचा अविभाज्य घटक असताना प्रत्येक क्षेत्रात अव्वल राहून नारी शक्तीचा प्रत्यय आणून देत असताना स्व शक्तीकरणावर भर द्यायला हवा असे भाष्य केले तसेच जगाची स्त्री हि आई झाली तर छत्रपती शिवाजी महाराज घडतात, स्त्री हि बहीण झाली तर ज्ञानोबांची मुक्ताई होते, मुलगी झाली तर गुंजन सक्सेना होते, पत्नी झाली तर सत्यवानाची सती होते. अशा असंख्य रूपात कल्याणकारी स्त्री सदैव अस्तित्व सिद्ध करीत असताना आपल्यात वावरत असते. तिचा आज सन्मान व शतशः प्रणाम …! जगाची उदगाते असलेल्या नारीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या…
शास्त्री फाउंडेशनच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांना जगप्रसिद्ध लॅक्मे फॅशन शो साठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्या प्रित्यर्थ त्यांचा देखील सत्कार महाविद्यालयामार्फत करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर बोलत असताना रूपा शास्त्री यांनी शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. सोई सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये सर्वगुण विशेष असून देखील ग्रामीण भागातील मुलींना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पाहिजे तसे अनुकूल वातावरण मिळत नाही. पण परिस्थितीशी झुंज देऊन आपण आपले विश्व स्वतः निर्माण करावे असे विद्यार्थिनींना त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे. स्त्री चे अस्तित्व फक्त एवढेच नसून तिच्या इच्छा आकांक्षा यांचा देखील विचार करायला हवा असे उद्गार काढत त्यांनी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप-प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.सुनील पाटील व प्रा. दिग्विजय पाटील यांनी प्रयत्न केले.
कामाचे आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख सर यांनी करून जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेला.