इमानवंत पुरुष व इमानवंत महिला हे सर्व एकमेकांचे सहकारी आहेत- — कुराण

मानियार बिरादरी तर्फे महिला भाजी विक्रेत्यांना सन कोट चे वाटप
जळगाव ( प्रतिनिधि )कवियत्री बहिणाबाई चौधरी बगीच्या समोरील व महाराणा प्रताप पुतळाखाली महिला भगिनी भाजी विक्रेत्याचे कार्य करीत असतात जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व त्यांचे सहकारी सय्यद चांद, ताहेर शेख, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल रऊफ टेलर,मुजा

हिद खान आदींनी महिला मंडळाच्या निवेदिता ताठे व डॉक्टर अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉक्टर अनिता कोल्हे यांच्या सहकार्याने भाजी विक्रेत्या महिला सोबत जागतिक महिला दिन साजरा केला.
महिलांचे स्थान व महिला दिनाचे महत्व
सर्वप्रथम जागतिक महिला दिन व इस्लाम मध्ये असलेले महिलेचे महत्त्व या बाबत फारुख शेख यांनी माहिती दिली. त्यात पवित्र कुराण मधील उपदेश समजवून सांगितले की स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे, परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांना उपस्थितांपैकी वयोवृध्द ताई च्या हस्ते केक कापण्यात आला व नंतर प्रत्येक भाजी विक्रेत्या महिलेस मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे सनकोट देण्यात आला (उन्हा पासून माता बघीणींचे संरक्षण व्हावे म्हणून)
स्वेच्छेने महिलांचे मनोगत
महिलां तर्फे काही भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यात एका भगीनेनी सांगितले की आजपर्यंत आम्हास जागतिक महिला दिन म्हणजे काय हे माहीत नव्हते ते आज आम्हास फारूक भाई ने समजविले व त्यासोबतच आम्हाला उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून सनकोट सुद्धा भेट दिला त्याबद्दल आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करतो.
दुसऱ्या भगिनीने अशा प्रकारचे आनंद क्षण आम्हास घरच्या लोकांकडून सुद्धा मिळालेले नसल्याची खंत व्यक्त करून बिरादरीचे आभार मानले.
यावेळी भाजी बाजारात आलेले ग्राहकांनी सुद्धा या सर्व भाजीविक्रेता महिलांचा व मुस्लिम मानियार बिरादरीचे अभिनंदन व कौतुक केले.
२