जबरी चोरी करणारे आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद – चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनची कारवाई..

धुळे (अनिस अहेमद) फिर्यादी मोहम्मद अरशद मोहम्मद अस्लम सलमानी वय 30 वर्ष, व्यवसाय चालक रा. पुरेमदन पोस्ट निगोह, ता. तिलोही, जि. अमेठी राज्य (उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली की, दि. 06/03/2023 रोजी फिर्यादी हा धुळे शहरात चाळीसगाव रोड चौफुलीवर इंदोर जाण्यासाठी वाहनांना हात देवून वाहन थांबवित असतांना रात्री 10.00 ते 10.30 वाजेचे दरम्यान अज्ञात तीन इसमांपैकी एकाने पिवळया रंगाचा टि-शर्ट व एकाने काळया रंगाचा शर्ट व एक सडपातळ अशांनी त्यास हाताबुक्यांनी मारहाण करुन त्याचे डाव्या कानाजवळ इच्छापुर्वक दुखापत करून त्याचे कब्जातील रुपये 8,000/- किमतीचा रेड-मी कंपनीचा मोबाईल व रोख रुपये 800/- जबरीने चोरुन हिसकावून नेल्याबाबत फिर्याद दिले वरुन चाळीसगाव रोड पो. स्टे भाग-5 गुरंन 62/2023 भा.दं.वि कलम 394.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे तपासात फिर्यादीने केलेल्या संशयीतांच्या वर्णनावरून त्यास रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे छायाचित्र दाखवून गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी अंबिका नगर, शब्बीर नगर भागात पेट्रोलिंग करुन सदर परिसरातून दोन संशयीत इसम यांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी 1) वसीम ऊर्फ वडया सलीम रंगरेज वय- 42 रा. शब्बीर नगर, धुळे 2) इमरान ऊर्फ बाचक्या शेख खालोद वय-25 रा. अंबिका नगर, शोभा चव्हाण यांचे घराजवळ, धुळे यांचेकडून तपासा दरम्यान वर नमुद गुन्हयातील मुद्देमालापैकी 8,000/- रुपये किमतीचा मोबाईल व 400/- रुपये रोख रक्कम हस्तगत केले असून गुन्हयाचा पुढील तपास पोनि धिरज महाजन हे करीत आहे.