धुळे पोलीस विभागातर्फे महिला दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन..

.
धुळे (अनिस अहेमद)सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा धुळे पोलिस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजिण्यात करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनींचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील सदुसष्ट महिलांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी धुळे जिल्हातील विवीध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीची छाप सोडणार्या मातृशकतीचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी आणि सामाजिक क्षेत्र , डॉक्टर, राजकारणात सक्रिय महिला, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, परिचारिका आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने नागरिक, महिला उपस्थितीत होत्या.