खानदेश वासियावर अन्याय निम्न तापी प्रकल्पाला फक्त १०० कोटी रक्कम…

अर्थसंकल्प प्रतिक्रिया
पाडळसे धरण जन आंदोलन समिती
सुभाष चौधरी(प्रमुख)
पाडळसे धरण जन आंदोलन समिती
अमळनेर (प्रतिनिधि) निम्न्न तापी खान्देशच्या जनतेची अर्थसंकल्पाने पुन्हा घोर निराशा केली आहे.धरणाच्या लाभक्षेत्रातील ६ पैकी ३ मतदारसंघात मुख्यमंत्री यांचे पक्षाचे आमदार आहेत तर एका मतदार संघात उपमुख्यमंत्री यांचे पक्षाचे आमदार,व २ खासदार आहेत अश्या स्थितीत हजारो कोटींच्या प्रकल्पासाठी १०० कोटी रक्कम सत्ताधारीपक्षाच्या आणि जनतेच्या दृष्टीने समाधानकारक नाही. खान्देशच्या जनतेसाठी निम्न्न तापी प्रकल्पाचे महत्व राज्य सरकारने अजूनही गांभीर्याने घेतलेले नाही.
जिल्ह्यातील मंत्री महोदय यांचेकडून खूप अपेक्षा होत्या.राज्यशासनाने जनआंदोलन समितीच्या मागणीनुसार सदर प्रकल्प केंद्र सरकार कडे वर्ग करावा यासाठी आम्ही आशावादी आहोत तरच पाडळसे धरण पूर्ण होईल अन्यथा भविष्यात जनआंदोलन समिती व राज्यकर्ते यांचा संघर्ष अटळ आहे.
रणजित शिंदे
पाडळसे धरण जन आंदोलन समिती
दर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाला १५०० कोटी देतांना खान्देशच्या निम्न्न तापी प्रकल्पाला यंदा जाहीर झालेला १०० कोटी निधी अत्यल्प आहे. आधीच मागील २ वर्षात जाहीर झालेला निधीच्या तुलनेत प्रशासनाने केलेला खर्च अत्यंत तोकडा व निराशाजनक व संतापजनक आहे. केंद्र सरकारच्या निधीशिवाय निम्न्न तापी प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही.यासाठी जनआंदोलन समितीने जनतेची हजारो पत्र पाठवून ‘पाडळसे धरनाचा केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समावेश करावा’ ही मागणी राज्यशासनाने तातडीने पूर्ण करावी आणि खान्देशवासीयांना न्याय द्यावा.