बदलाचे नेतृत्व करणाऱ्या जगभरातील महिलांची शक्ती हेच खरे महिला सबलीकरण :
डॉ. नूतन राठोड
एरंडोल महाविद्यालयात महिला दिवस उत्साहात साजरा..

एरंडोल ( प्रतिनिधि. )
एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व युवती सभा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिवसाच्या निमित्ताने “नारी सन्मान व गौरव” या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात

आले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते म्हणून मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील डॉ. नूतन राठोड मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत विखरण येथील सरपंच सौ. नम्रता दिपक गायकवाड तसेच जवखेडा बुद्रुक येथील सरपंच सौ. सुनीता प्रकाश महाजन, उपसरपंच सौ. रंजनाताई विजय पाटील यांचा सन्मान तथा गौरव महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचाल आणि कार्यानिमित्त करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. नरेंद्र तायडे, प्रा. विजय गाढे, डॉ. शर्मिला गाडगे तसेच युवती सभा मंचच्या सचिव डॉ. स्वाती शेलार, डॉ. रेखा साळुंखे, डॉ. सविता पाटील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. आत्माराम चिमकर, डॉ. नितीन दांडेकर, प्रा. महेंद्र शिरसाठ, प्रा. सुनील सजगणे आदी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्वाती शेलार यांनी केले. कार्यक्रम आयोजनाचा उद्देश तसेच महिला दिवस का साजरा केला जातो? त्याचा इतिहास आपल्या प्रस्ताविकेतून त्यांनी मांडला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. नरेंद्र तायडे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नूतन राठोड यांनी महिला सबलीकरणाचे टप्पे आणि आज सबळ झालेली महिला त्यांनी मिळविलेले दैदीप्यमान यश याचा आढावा आपल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा विद्यार्थ्यांसमोर घेतला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतल्याचे ही यावेळी आवर्जून नमूद केले. आपल्या दैनंदिन जीवनात महिला कोणत्याही पदावर असली तरी तीला आजी, आई, बहिण अशा अनेक भूमिका साकारत रहावे लागते असेही त्यांनी आपल्या पावर पॉइंट सादरीकरणातून त्यांनी चित्रमय पद्धतीने उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील सर यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन, महिलांनी केलेली अतुलनीय कामगिरी याचा आढावा घेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सामाजिक कार्यात ज्यांनी योगदान दिलेले आहे अशा सिंधुताई सपकाळ, क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आदींची उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थी यांना त्यांनी महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे आपले मत यावेळी मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी कु. जयश्री पाटील, कु. करुणा पाटील, तसेच कु. प्राची मोरे महिला अबला ते सबला असा प्रवासाचा देखावा आपल्या नृत्य अविष्कारातून आणि पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गाढे यांनी केले तर डॉ. शर्मिला गाडगे यांनी आभार मानले.