शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले याची पुण्यतिथी साजरी..

एरंडोल (प्रतिनिधि)शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे दि. १०-०३-२०२३ शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पराग कुलकर्णी यांनी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस फुलाहार वाहुन अभिवादन केले. डॉ. पराग कुलकर्णी यांनी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या बद्दल माहिती देत म्हणाले कि सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होत्या. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाची कार्ये त्यांनी केले. अशा प्रकारे माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी सावित्री बाई फुले यांच्या बद्दल आदर व्यक्त करत शब्द सुमनांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेला.