अमळनेरच्या कुमारी साक्षी पाटील हीची विद्यापीठ क्रिकेट
संघात निवड..

0

अमळनेर (प्रतिनिधि)येथील रहिवासी व नूतन मराठा विद्यालय येथील विद्यार्थीनी कु. साक्षी दीपक पाटील हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाली असून तिच्या या कामगिरी बदल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ही क्रिकेट स्पर्धा भुवनेश्वर राज्य ओडिसा येथे दि. 08 मार्च ते 15 मार्च या कालावधीत होणार आहे. साक्षी पाटील ही साने गुरुजी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून तिचे वडिल दीपक पाटील हे आरोग्यसेवक तर आई स्नेहलता पाटील ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. साक्षी या आधी देखील 17 वर्षाआतील महाराष्ट्र संघात खेळली असून रणजी कॅम्प साठी देखील निवड झाली होती. विद्यापीठाचे क्रीडा संचालक तथा विभाग प्रमुख डॉ. दिनेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील आदींनी तिचे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!