सौ.शैलजा रणजित शिंदे यांना “शिक्षण गौरव पुरस्कार” प्रदान. सामाजिक चळवळीत मोठे योगदान..

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ,महाराष्ट्र महिला पुरोगामी महिला मंच तर्फ़े शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शैलजा रणजित शिंदे यांना शिक्षण गौरव पुरस्कार आ.मंजुळताई गावित याच्या हस्ते देत धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलाना पुरस्कार वितरण सोहळा नुकताच धुळे येथे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत धुळे येथे संपन्न झाला.मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि प शिक्षण सभापती महावीर रावल तर सत्कार सोहळा उदघाटक म्हणुन जि प अध्यक्षा सौ अश्विनी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस ,महापौर सौ.प्रतिभा चौधरी,सुप्रसिद्ध विनोदी हास्य अभिनेता हेमंत पाटील,माजी महापौर जयश्री अहिरराव ,मा.कृषी सभापती संग्राम पाटील,मा.सभापती प्रा अरविंद जाधव ,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सौ रंजीता धिवरे आदिंसह मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सौ.शैलजा रणजित शिंदे यांनी माध्यमिक शिक्षण विभाग धुळे येथे उप शिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी तसेच शिंदखेडा पंचायत समिती क्षेत्रात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून शैक्षणिक विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाभिमुखदृष्टीने विद्यार्थी लाभाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासह शैक्षणिक गुणात्मक बदलासाठी शिक्षकांसह सातत्याने कार्यरत आहे. प्रशासकीय शिस्तीसह शैक्षणिक क्षेत्रात सौजन्यशीलवृत्तीने कार्यरत अश्या अधिकारी असून अमळनेर येथिल जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा म्हणूनही काम केलेले आहे.विविध महिला मंडळ व सामाजिक चळवळीत त्यांचे उत्स्फूर्तपणे योगदान असते अश्या पार्श्वभूमीवर सौ.शैलजा रणजित शिंदे यांना ‘शिक्षण गौरव पुरस्कार’ सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले.सोबत त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे उपस्थित होते.
सौ.शैलजा रणजित शिंदे यांना शिक्षण गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिंदखेडा प स चे गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील , पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भुपेश वाघ, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे धुळे अध्यक्ष शांताराम कदम, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.लिलाधर पाटील,युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, ठाकूर समाज अध्यक्ष दिलीप ठाकूर , वासुदेव जोशी समाजाचे कार्यकर्ते विलास दोरकर, नरडाणा केंद्रप्रमुख अरविंद पाटील, शिंदखेडा तालुक्यातील केंद्रप्रमुख जगदीश पाटील, राजेंद्र पाटील आदींसह प्राथमिक , माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!