माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत एरंडोल नगरपालिका मार्फत स्वच्छता मोहीमेचा समारोप.

एरंडोल (प्रतिनिधि)
एरंडोल नगरपालिकेमार्फत दि.०४/०१/२०२३ ते १५/०३/२०२३ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान -३ अंतर्गत दर बुधवारी स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा प्रारंभ नविन वर्षाची सुरुवात म्हणून ही मोहीम पुन्हा एकदा नव्या जोमाने दि.०४/०१/२०२३ रोजी पासून प्रभाग क्र.९ पासून सुरु करण्यात आली होती तर मोहीमेचा समारोप दि. ०८/०३/२०२३ रोजी प्रभाग क्र. १ मध्ये करण्यात आला.
एरंडोल नगरपालिका मार्फत आयोजित करण्यात आलेला साप्ताहिक स्वच्छता मोहिम ही मा.मुख्याधिकारी
तथा प्रशासक श्री. विकास नवाळे, एरंडोल नगरपालिका यांच्या मार्गदर्शखाली करण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेत प्रत्येक प्रभागातील मुख्य रस्ते, गटारी यांची साफ सफाई, जंतूनाशक फवारणी, खुल्या जागेत वृक्षारोपण, प्लास्टिक गोळा करणे इत्यादी कामे हाती घेण्यात आली होती.
यासाठी एरंडोल नगरपालिकाकार्यालया मार्फत चार टिम करुन प्रत्येक टिमला आप आपल्या जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या होत्या. या स्वच्छता मोहिमेत न.पा.एरंडोल कार्यालय अधिक्षक श्री. विनोदकुमार पाटील,
डॉ. योगेश सुकटे, डॉ. अजित भट्ट, विक्रम घुगे, देवेंद्र शिंद्रे, प्रियंका जैन, अनिल महाजन, हितेश जोगी, राजेंद्र पाटील,
विवेक कोळी, भूषण महाजन, दिपक गोसावी, सुरेश दाभाडे आदीसह अधिकारी/कर्मचारी व सर्व साफ सफाई कर्मचारी
यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. तर प्रत्येक प्रभागातील नागरीकांनी न.पा.मार्फत राबविण्यात येणाऱ्या साप्ताहिक
स्वच्छता मोहिमेबाबत समाधान व्यक्त करुन कौतुक केले.