उर्दू पत्रकार सईद पटेल यांचा गौरव – उर्दू घर समितीचा उपक्रम…

जळगाव (प्रतिनिधि) परभणी येथील जय हिंद सेवा भावी शिक्षण संस्थेने महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, राजकीय, संस्कृतीक व पत्रकारिता क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले यात जळगाव शहराचे तथा उर्दू टाइम्स व एशियन एक्सप्रेस चे वरिष्ठ पत्रकार तथा स्तंभ लेखक सईद पटेल यांना सुध्दा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उर्दू घर समिती जळगाव तर्फे गौरव
उर्दू घर समितीचे सईद पटेल हे संचालक असल्याने त्यांचा उर्दू घर समिती तर्फे शाल व मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला या वेळी समितीचे मुख्य समन्वयक फारूक शेख,कुलजमाती अध्यक्ष सय्यद चाँद,एम आय एम अध्यक्ष अहमद शेख, शिवसेना बाळासाहेब ठाकरे महानगर अध्यक्ष जाकीर पठाण व मतीन सैयद, हुसेनी फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, ए यु फौंडेशन चे अध्यक्ष अन्वर खान, अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार अकिल ब्यावली, सिनेट सदस्य शब्बीर सय्यद, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, युवा मानियार बिरादरीचे मोहसीन युसूफ, वसीम शेख,अख्तर शेख, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान यांची उपस्थिती होती.