एरंडोलला जागतिक ग्राहक दिन साजरा..
दिशाभूल, फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे केले आवाहन..

एरंडोल ( प्रतिनिधि ) – ज्येष्ठ नागरीकांनी फसव्या, दिशाभूल करणार्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे जागतिक ग्राहकदिनी एरंडोलला आवाहन करण्यात आले.
दरवर्षी शासना आदेशानुसार एरंडोल तहसिल कार्यालयामार्फतच जागतिक ग्राहक दिनाचा (आणि राष्ट्रीय ग्राहक दिन) कार्यक़्रम आयोजित केला जातो परंतू सध्या 14 मार्चपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारींचा बेमुदत संप, काम बंद आंदोलन सुरू असल्याने अ. भा. ग्राहक पंचायत एरंडोल शाखेतर्फे सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात जागतिक ग्राहक दिन कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले. एरंडोल येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त (15 मार्च) आयोजित कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी होते. प्रमुख अतिथी माजी उपनगराध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड, काँग्रेसचे नेते विजयअण्णा महाजन होते. कार्यक़्रमाची सुरूवात स्वामी विवेकांनद प्रतिमापुजन, दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी प्रास्ताविकात ग्राहक दिनाची गरज, महत्व, सावधानता बाबत माहिती दिली. यावेळी शेतकरींची देखील अनेकवेळा फसवणूक केली जाते. बियाणे, औषधी, कपडे खरेदी करतांना पावती घेण्याचे आवाहन विजयअण्णा महाजन, शालिग्रामभाऊ गायकवाड, रविंद्र पाटील, कवी निंबा बडगुजर, नामदेवराव पाटील, अरूण माळी यांनी केले. पत्रकार कमरअली सैय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत पाटील, जाधवराव जगताप, विश्वनाथभाऊ पाटील, वसंतराव पाटील, मनसे तालूकाध्यक्ष विशाल सोनार, शेखर बुंदेले, सुपडू शिंपी, जगन महाजन, गणेश पाटील, भगवान महाजन, मालती पाटील आदींची उपस्थिती होती. आदींची उपस्थिती होती.