आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज,

24 प्राईम न्यूज 18 मार्च 2023.
आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात
अवकाळी पावसाची शक्यता आहे .
या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आह दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
20 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. आजही पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली