दृष्टी हॉस्पिटल येथे रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा..

अमळनेर- (प्रतिनिधि) अमळनेर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.कौस्तुभ वानखेडे यांचे दृष्टी हॉस्पिटल मध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. “काचबिंदू ” हा एक प्रकारचा विशिष्ट रोग आहे जो जगभरातील

टाळता येण्याजोग्या अपरिवर्तनीय अंधत्वाचे प्रमुख कारण म्हणून काचबिंदूवर प्रकाश टाकतो. रोटरी क्लब अमळनेर तर्फे आयोजित WORLD GLAUCOMA WEEK 2023 साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १३० रुग्णांचे डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. यात ७ काचबिंदू पेशंट नोंद करण्यात आले व ५ रुग्ण हे मोतीबिंदूचे आढळून आले. सदर शिबिराचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. कौस्तुभ ठाकूर यांनी व त्यांच्या रुग्णालयातील सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी रोटरी प्रेसिडेंट रो कीर्तिकुमार कोठारी, प्रोजेक्ट चेअरमन म्हणून रो. रोहित सिंघवी, सचिव ताहा बुकवाला रो. वृषभ पारख, रो. डॉ. राहुल मुठ्ठे , रो. डॉ.प्रीतम जैन ,रो. डॉ.अनिल वाणी, रो. आशिष चौधरी, रो. किशोर लुल्ला, रो. महेश पाटीलसह आदी उपस्थित होते