अंतुर्ली येथील युवकाच्या खून प्रकरणी आरोपींना २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी…

एरंडोल(प्रतिनिधि) अंतुर्ली तालुका पाचोरा येथील सचिन उर्फ सोनू देविदास पाटील यांच्या हत्ये प्रकरणी संशयित आरोपी शुभम ज्ञानेश्वर पाटील वय २४ वर्ष राहणार गिरड तालुका भडगाव व समाधान सुधाकर पाटील वय २९ वर्षे राहणार वेरूळी खुर्द तालुका पाचोरा या आरोपींना २० मार्च २०२३ रोजी रात्री तीन वाजता कासोदा पोलिसांनी अटक केली या दोघा आरोपींना सोमवारी एरंडोल न्यायालया समोर समोर हजर करण्यात आले असता त्यांना २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायमूर्ती विशाल धोंडगे यांनी केला.
आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यात वापरले ले शस्त्र व वाहन जप्त करणे बाकी आहे सदर गुण्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीची इतर साथीदार आरोपी यांच्या शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात अटक करणे बाकी आहे या प्रमुख कारणास्तव आरोपी त्यांची पोलीस कोथळी मागण्यात आली.
सचिन उर्फ सोनू देविदास पाटील यास निलेश ज्ञानेश्वर देसले यांचे सांगण्यावरून कोणीतरी अज्ञात इसमाने संगमत करून गिरणा नदीकाठी खाजामिया दर्गा शिवारात निलेश व सोनू यांच्या पूर्वीच्या पैशाचा वादावरून कोणीतरी अज्ञात इसमानाने कोणत्यातरी तिक्षण हत्याराने त्याच गंभीर दुखापत करून त्यात गंभीर जखमी केले त्या जखमांमुळे त्याचा अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला म्हणून कासोदा पोलीस स्टेशनला खुण केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संशयित आरोपी शुभम पाटील व समाधान पाटील या दोघांना २० मार्च रोजी रात्री तीन वाजता अटक केली .
ॲड प्रतिभा पाटील व ॲड वसंत पाटील यांनी आरोपीं तर्फे काम पाहिले तर सरकार तर्फे चेतना कलाल यांनी काम पाहिले.