अमळनेर लायन्स क्लबच्या सामाजिक तसेच आरोग्यासाठी घेण्यात आलेले कार्य कौतुकास्पद. प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया…

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर येथे प्रांतपाल एम जे एफ पुरुषोत्तम जयपुरिया यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमाचे तसेच वर्ष भरातील कार्यक्रमाचा
आढावा घेण्यात आला.

प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरीया यांनी अमळनेर लायन्स क्लब च्या सामाजिक तसेच आरोग्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमांचे यावेळी कौतुक केले. यावेळी रिजन चेअरमन एमजेएफ ला. जयेश ललवाणी, झोन चेअरमन ला. नीरज अग्रवाल, सुशील पांडे उपस्थित होते.बन्सीलाल पॅलेस येथे सम्पन्न झालेल्या बैठकीत विविध सामाजिक संस्थांचा तसेच देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यात लायन्स एक्स्पो मध्ये सहभागी देणगीदार, मोतीबिंदू तसेच मरणोत्तर नेत्रदान केलेल्या दात्यांचे कुटुंबिय, नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल मुठे तसेच लायन्स क्लब च्या २९ माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब तर्फे मंगळ ग्रह मंदिरा तील भाविकांसाठी वॉकर व व्हील चेअर मंदिराच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आले व गरजू महिलेला सीलाई मशीन प्रांतपाल यांच्याहस्ते देण्यात आले. प्रास्ताविक प्रेसिडेंट योगेश प्रास्ताविक प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी केले. तर वर्षभरातील उपक्रमांची माहिती तसेच आढावा सेक्रेटरी महावीर पहाडे यांनी सादर केला.
येथील ला. बजरंग अग्रवाल व ला. योगेश मुंदडे यांनी प्रत्येकी एक हजार डॉलर ची भरीव देणगी एलसीआयएफ ला दिली. याप्रसंगी दोघे देणगीदारांना एमजेएफ सभासद पद बहाल केले. यावेळी लायन्स, लिओ तसेच लीनेस क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सी. ए. नीरज अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सदस्यांनी मदत केली.