शास्त्री फार्मसी तर्फे शहिदांना आदरांजली..

एरंडोल ( प्रतिनिधि ) गुरुवार रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल जळगाव येथे शहीद दिनानिमित्त स्वतंत्र सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे एच. ओ. डी. प्रा. जावेद शेख यांनी शाहिद भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून आदरांजली वाहण्यात आली व त्यांनी विद्यार्थ्यांना या महान पुरुषान बद्दल माहिती देत सांगितले कि, दरवर्षी २३ मार्च हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, जेव्हा भारतीयांना ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आणि इतर स्वातंत्र्य विरानीं दिलेल्या बलिदानाची आठवण करतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळीत अगदी लहान वयात या वयात खेळण्याचे दिवस असतात अशा वयात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ हा दिवस आहे. हा तो दिवस होता ज्या दिवशी भारतातील ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्र्यवीर भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तीन स्वातंत्र्यसैनिकांना लाहोर तुरुंगात (सध्या पाकिस्तानात)डांबून ठेवण्यात आले होते नंतर त्यांना फाशी देण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाचे प्राध्यापक अजिंक्य जोशी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. हेमंत चौधरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेलेव त्यांचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.