समाज सेविका सौ वैशाली शेवाळे यांचा कर्तबगार महिला रत्न पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील समाजसेविका सौ वैशाली शरद शेवाळे यांना महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धुळे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई पाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद,मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, यात महाराष्ट्र राज्यातील शिक्षण,समाजसेवा, कला क्रीडा,साहित्य,आरोग्य,अर्थकारण,समाजकारण, राजकीय,बांधकाम,उद्योग सांस्कृतिक, बचतगट आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या कर्तबगार महिला रत्नांचा सन्मान करण्यात आला.यात जळगाव जिल्ह्यातून अमळनेर येथील वैशाली शेवाळे यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने निवड झाली होती, त्या मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा परबोधन परिषदेच्या जळगाव जिल्हा अधक्षा आहेत त्यांना मेघाताई पाटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत शरद शेवाळे व नाविन्य शेवाळे उपस्थित होते.सदर पुरस्काराबद्दल अनेकांनी सौ शेवाळे यांचे अभिनंदन केले अमळनेर वासियांसाठी अभिमानाची बातमी आहे.