बुधवारी चंद्र दर्शन न झाल्याने रमजान पर्व शुक्रवारपासून..

जळगाव ( प्रतिनिधि) रमजान पर्व शुक्रवार पासून – रुहत-ए-हिलाल समिती ची घोषणा
रुहत ए हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी जामा मस्जिद मध्ये रात्री झालेल्या सभेत घोषीत केलि
मुस्लिम कब्रस्थान व ईदगाह ट्रस्ट च्या वतीने सभेचे आयोजन रथ चौक येथील जामा मस्जिद मध्ये मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यात शहर ए काझी मुफ्ती अतिकुर रहेमान सह शहरातील सर्व मस्जिद चे इमाम,विश्वस्त, प्रतिष्टीत नागरिक सह ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतात कुठेही चंद्र दर्शन नाही
रमजान चंद्र दर्शन बाबत भारतातील प्रमुख शहरातील इमाम,जमियत, व उलमा कोन्सिल शी संपर्क साधले असता चंद्र दर्शन न झाल्याचे वृत्त हाती आल्याने ही घोषणा करण्यात आली.
ट्रस्ट तर्फे मानद सचिव फारूक शेख यांनी सभेचे सूत्रसंचालन केले तर आभार अध्यक्ष वहाब मलिक यांनी मानले.