नव वर्ष स्वागत यात्रा उत्साहात साजरी. चित्र रथ व तरूणाईचा उत्स्फूर्त सहभाग या मिरवणूकीचे वैशिष्ट्य..

अमळनेर (प्रतिनिधि ) नव वर्ष स्वागत यात्रा अतिशय उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. विविध विषयांवरील चित्र रथ व तरूणाईचा उत्स्फूर्त सहभाग या मिरवणूकीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रताप मिल कंपाउंडमधील
बन्सीलाल पॅलेस येथे पालखी व गुढीचे पूजन करून मिरवणूकीस सुरूवात झाली. स्टेशन रोड,स्वामी नारायण मंदिर,सिंधी बाजार,सुभाष चौक,राणी लक्ष्मीबाई चौक,सराफ बाजार,वाडी चौक,माळी वाडा,बहादरपूर रोड,झामी चौक,पवन चौक,तिरंगा चौक,बस स्टँड मार्गे जि.प.विश्रामगृह येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. समारोप प्रसंगी प्रास्ताविक बजरंगलाल अग्रवाल यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले. सौ.बोरकर व सहकारी यांनी म्हटलेल्या

पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या स्वागत मिरवणूकीत गायत्री परिवार यांची पालखी,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाडी संस्थान,स्वामी नारायण मंदिर संस्था,मंगळ ग्रह सेवा संस्था,मोठे बाबा मंदिर संस्था,जळगाव जनता बॅंक,गौशाळा,स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल,प्रताप कॉलेज,फार्मसी कॉलेज,प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवार,विश्व हिंदु परिषद व बजरंग दल,जनसेवा फाऊंडेशन,जळगाव पिपल्स बॅंक,नगर पालिका,अमळनेर अर्बन बॅंक,माळी समाज संस्था,महावीर युवा परिषद,विश्वकर्मा मित्र मंडळ,अबॅकस,मंगलादेवी चौक मित्र मंडळ,गजानन महाराज सेवक मंडळ,अग्रसेन महाराज समाज मंडळ,ज्ञानेश्वर पाठशाळा,माजी सैनिकांचे खान्देश रक्षक दल,वारकरी शिक्षण संस्था,हरी ओम सेवक परिवार यांचे विविध विषयांवरील प्रबोधनपर चित्ररथ,तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कूल,खा.शि.मंडळाचे फार्मसी कॉलेज,एन.एस.एस.चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तर आमदार अनिल पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी,सुभाष भांडारकर,खा.शि.मंडळाचे संचालक योगेश मुंदडे,नीरज अग्रवाल,उद्योजक ओमप्रकाश मुंदडा,डॉ.चंद्रकांत पाटील,
अॅड.व्ही.आर.पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,
पं.स.चे माजी सभापती श्याम अहिरे,प्रा.धर्मसिंह पाटील,
अशोकराव पाटील,पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत,
लालचंद सैनानी,अजय केले,
प्रविण पाठक,नरेंद्र चौधरी,प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,प्रकाश ताडे,सुरेश पवार,संजय विसपुते,नरेंद्र निकुंभ,महेश पाटील,चंदूसिंग परदेशी आदींची उपस्थिती होती.