कुर्षी मंत्री माननिय अब्दुल सत्तार यांनी टाकर खेडे येथे धावती भेट..

अमळनेर (प्रतिनिधि) राज्यभरात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री मा.ना.अब्दुलजी सत्तार हे जळगांव जिल्हा दौऱ्यावर असतांना अमळनेर तालुक्यात टाकरखेडे येथे नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले बरेच शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित आहेत, तसेच गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे. हे नुकसान सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे व्हावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मा.मंत्री महोदयांकडे केली. या मागणीची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत, शासन अतितातडीची मदत जाहीर करण्यासाठी सकारात्मक असुन एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहु नये असे आदेश उपस्थित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना दिले. यावेळी तसेच अमळनेर शिवसेना व टाकरखेडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने कृषी मंत्री यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. मंत्री लगेच पुढील दोऱ्यावर रवाना झाले.