महीला कलश याञेने श्रीमद्भागवत कथेचा शुभारंभ.

एरंडोल(प्रतिनिधि) एरंडोल येथे जहागीरपुरा भागात जयश्रीराम प्रतिष्ठान तर्फे २२मार्च ते २९मार्च२०२३ दरम्यान संगीतमय श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प राधाताई पाटील(भोलाणेकर) या कथाकार आहेत.
२२मार्च रोजी महीला कलश याञा सायंकाळी बुधवार दरवाजा पासून निघुन मेनरोड-भगवा चौक-मारवाडी गल्ली-अमळनेर दरवाजा-नागोबा मढी-मारूती मढी-माळीवाडा-खोल महादेव मंदीर या भागांत जाऊन कार्यक्रमस्थळी कलश याञेची सांगता झाली.
या कलशयाञेचे ठिकठिकाणी आरती करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
२४मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत श्रीराम चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या संगीतमय श्रीमद्भागवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयश्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.नितिन पाटील,उपाध्यक्ष अमर महाजन,सचिव प्रदिप फराटे,खजिनदार डॉ.सुमेध महाजन,जंगलू पाटील,गोकुळ महाजन, सदा महाजन,अवी पेंटर,आनंदा चौधरी,गुलाब चौधरी,शशीकांत पाटील,अरूण पाटील,वसंत लोहार,जितू पाटील आदींनी केले आहे.