एरंडोल येथे पांडव नगरी बहुद्देशीय संस्था तर्फे श्रीराम जन्मोतस्व सोहोळा व दिंडी कार्यक्रम होणार.

एरंडोल. ( प्रतिनिधि) एरंडोल येथे पांडव नगरी बहुद्देशीय संस्था तर्फे श्री राम जन्मोत्सव सोहळा व संगीतमय श्रीराम कथा सजिव देखावा २३ मार्च गुरुवारी रात्री ८ते१०.३० वाजे पर्यंत होणार आहे कथा ची सांगता २९ मार्च बुधवारी होणार आहे.
आज संध्याकाळी ४ वा. कलश यात्रा निघणार आहे. रामनवमी नियमित्त संगीतमय श्रीराम कथा श्री विजय कुमार जी पलोड ( छत्रपती संभाजी नगर) यांचा सुमधुर वाणीतून आयोजित केली आहे.
काल हिंदू नववर्ष गुडी पाडवा रोजी भगवा शोभा यात्रा निघाली होती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गूडी पुजन पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली.
३० रोजी सकाळी १० वा. तसेच रामजन्म उत्सव सोहळा तसेच संध्याकाळी ४ वा. दिंडी सोहळा होणार आहे. ३१ रोजी शुक्रवारी ९.३० ते ११.३० वाजे पर्यंत युवा किर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज नाशिककर किर्तन होणार. १२ वाजे पासून महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम चे आयोजन श्रीराम मंदिर, कासोदा दरवाजा, परदेशी गल्ली, एरंडोल येथे होणार आहे.
जास्त ते जास्त भाविकांनी कथेचे लाभ घ्यावा असे आवाहन पांडव नगरी बहुद्देशीय संस्था तर्फे करण्यात आले आहे.