गुडी पाडव्याच्या शुभ दिनी देवपुरातील सदाशिव नगर येथील संकल्पित महादेव मंदिराच्या संरक्षण भिंतीचे कामाच्या समई प्रज्वलित करून आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ..!

धुळे (अनिस अहेमद) गुडी पाडव्याच्या शुभ दिनी शहरातील देवपुर भागातील सदाशिव नगरात लोक सहभागातून साकारत असलेल्या या भव्य दिव्य मंदिरा

च्या संरक्षण भिंती साठी पत्रकार महेश घुगे यांच्या नेत्तुत्वा खाली सदाशिव नगरातील नागरिकांनी आमदार फारूक शाह यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती नागरिकांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आमदार फारूक शाह यांनी आपल्या आमदार स्थानिक निधीतून या सरंक्षक भिंती साठी निधी मंजूर केला होता . गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर समई प्रज्वलित करून आमदार फारूक शाह यांच्या हस्ते या कामाचे शुभारंभ करण्यात आले धुळे शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते,गटार,पुल व पाण्याचे पाईप लाईन संदर्भातील मुलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने कोणताही भेदभाव न करता निधी उपलब्ध केला जात आहे. आजपर्यंतच्या आमदारांच्या कार्यकाळातील कामाचे व आमदार फारुख शाह यांच्या कार्यकाळातील कामाचे मूल्यमापन केल्यास आमदार फारुख शाह यांचे काम वरचढ होताना दिसत आहे. देवपुरातील सदाशिव नगर येथील संकल्पित महादेव मंदिराच्या संरक्षण भिंतीचे कामाच्या शुभारंभाचा वेळेस महेश बाबा घुगे, नगरसेवक नंदु सोनार,गनी डॉलर, डॉ.जगदीश गिंदोडीया, डॉ.दीपश्री नाईक, इंजि.पराग अहिरे,कार्यकारी अभियंता ओस्तवाल, ह.भ.प. महेंद्र महाराज, निजाम सय्यद, प्यारेलाल पिंजारी, एकबाल शाह, शहजाद मन्सुरी, आसिफ शाह, सुलेमान मलिक, ताराचंद माळी, शामकांत पवार, शिवाजी देवांग, इंदुबाई माळी, जितु शिंदे, उमाताई घुगे, रजनी देशमुख, छाया सोनावणे, छाया कासार, लक्ष्मीकांत गीते, मिलिंद देशमुख, दिपक बेडसे, संदीप माळी, योगेश कासार, मिलिंद भामरे, सुहास ओगले व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.