धुळे शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या आझाद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

0

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरात नटराज टॉकीज मागे नित्यानंद नगर, जलाराम मंदिर समोर वडीलोपार्जीत राहते बंद घर आहे. दि. १६/३/२०२ रोजी रात्री ००.४५ ते ०४.०० वा. दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने सदर बंद घराचे कुलूप तोडून घरातील २५,००० रु. किंमतीचा LED ३२ इंची टी.व्ही. व २४,००/-रु. किंमतीचे पितळी व तांबे धातूचे देवी देवतांच्या मुर्त्या तसेच चांदीच्या पादूका असा एकूण २७,४००/-रु. किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याने आझादनगर पो.स्टे. भाग ५ गुरन ८१/२०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दि. २०/३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडलेल्या घटनास्थळा वर मिळून आलेले CCTV फुटेज मध्ये दिसत असलेल्या इसमाचा शोध पथकाने बारकाईने शोध घेता तो हद्दीतील सराईत गुन्हेगार ईमरान रफीक शेख, वय २३, रा. आकरा हजार खोली, मालेगांव, जि. नाशिक हा असल्याची खात्री झाल्याने तात्काळ चा मालेगांव येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेवून सदर आरोपीतास ताब्यात घेवून त्यास विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून चोरी केलेले २५,००० रु. किंमतीचा सोनी कंपनीचा LED ३२ इंची टी.व्ही. व २४,००/-रु. किंमतीचे पितळी व तांबे धातूचे देवी देवतांच्या मुर्त्या तसेच चांदीच्या पादूका असा एकूण २७,४००/-रु. किंमतीचा मुद्देमाल तसेच गुन्हा करते वेळी वापरलेले ८०,०००/- रु. किंमतीची पांढ-या रंगाची यामाहा कंपनीची फ्रेजर मोटार सायकल क्र. MH-15/DD-1790 काढून दिली आहे. नमूद आरोपीता कडून एकूण १,०७,४००/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुध्द धुळे व मालेगाव येथे चोरी-घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे. त्याने अशाचे प्रकारे इतर ठिकाणी कोठ-कोठे गुन्ह आहेत. त्याचे साथीदार कोण आहेत या बाबत तपास सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक, श्री. किशोर काळे, सहा पोलीस अधिक्षक श्री. एस. ऋषिकेश रेड्डी, पो.निरी श्री. हेमंत पाटील, स्था. गु. शा. धुळे यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पो.स्टे. चे श्री. प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकातील पोहेकॉ / आरीफ सैय्यद, प्रकाश माळी, योगेश शिरसाठ, पोना/संदिप कढरे, चंद्रकांत पाटील, राजू ढिसले, आतिक शेख, सुशिल शेंडे, अजहर शेख, शोएब बेग, सिध्दांत मोरे, चालक पोकों/संतोष घुगे यांनी सदरची कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास हेकॉ / योगेश शिरसाठ व अविनाश लोखंडे हे करीत आहेत. गेली निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!