रमजान पर्व साठी मानियार बिरादरीतर्फे रमजान किट- आनंदाचा शिधा वाटपाला सुरवात..

जळगाव (प्रतिनिधि) २४ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या रमजान निमित्त जळगाव शहरातील मुस्लिम समुदायातील गरजू रोजेदारांसाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे मोफत रमजान किट अर्थातच आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे.
रमजान किट -आनंदाचा शिधा गरजूंना मिळणार
रमजानच्या शिधा किटमध्ये २० वस्तूंचा समावेश असून सरासरी १५०० रु प्रती
किट ची किंमत असून प्राथमिक स्वरूपात १०० किट वाटप करण्यात येत आहे. आवश्यकते नुसार किट च्या संख्येत वाढ करण्यात येईल व गरजू ला किट देण्यात येईल असे बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी वितरित करतांना उपस्थितांना आश्वाशीत केले.
किट मध्ये या वस्तूंचा आहे समावेश

तेल २किलो,साखर किलो,पोहे १किलो,तूरडाळ १किलो,चना१किलो,शेंगदाणा १/२ किलो,बेसन पीठ १/२ किलो, मुंग व उडद डाळ प्रत्येकी १/२किलो, मट दाळ, मिरची,धना पावडर, चहा पत्ती( प्रत्येकी पाव किलो) हळद पावडर पॅकेट, साबण ३, रुहअफजा शरबत १ लिटर बॉटल व रोट २ किलो.
गरजूंची नावे परिसरातील जवाबदार व्यक्तीच देत आहे
गरजू लोकांची नावे ही मोहल्यातील जवाबदार व्यक्ती, मस्जिद चे प्रमुख हे सर्वे करूनच नावे देत असल्याने त्याच गरजूंना हे रमजान किट घरपोच देण्यात येत आहे.त्यामुळे कोणीही डायरेक्ट बिरादरी कडे संपर्क करू नये व आपल्या परिसरातील प्रमुख व मस्जिद चे प्रमुखाला भेटून नावे कळवावी.
आवाहन…
मोहल्ला प्रमुखांनी किंवा मस्जिद च्या प्रमुखांनी अजून काही गरजू दिसून आल्यास त्वरित बीरादरीचे अध्यक्ष फारूक शेख,उपाध्यक्ष सैयद यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.